रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकप्राप्त पी.व्ही. सिंधू फ्रान्स बॅडमिंटन सुपरसीरिजच्या निमित्ताने नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. ऑलिम्पिकनंतर झालेल्या सत्कार सोहळ्यांमुळे सिंधू महिनाभर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये खेळू शकली नाही. डेन्मार्क स्पर्धेद्वारे सिंधूने पुनरागमन केले. मात्र दुसऱ्याच फेरीत सयाका साटोने तिला नमवले.

फ्रान्स स्पर्धेत सिंधूची सलामीची लढत हाँगकाँगच्या यिप पुई यिनशी होणार आहे. हा अडथळा पार केल्यास दुसऱ्या लढतीत सिंधूचा मुकाबला चीनच्या ही बिंगजिओशी होणार आहे. डेन्मार्क स्पर्धेत सिंधूने सलामीच्या लढतीत बिंगजिओला नमवले होते.

पुरुष गटात, अजय जयरामची लढत पात्रता फेरीचा अडथळा पार करून येणाऱ्या खेळाडूशी होणार आहे. एच.एस. प्रणॉयसमोर बूनसुक पोनसन्नाचे आव्हान असणार आहे. बी. साईप्रणीत आणि ली ह्यु समोरासमोर असणार आहेत. मनू अत्री आणि सुमित रेड्डी जोडीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. समीर वर्माला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे.