आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) कसोटी संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची ऐतिहासिक कामगिरी पाकिस्तानच्या संघाने केली आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली तरीही भारतीय संघाला कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाला अव्वल स्थान कायम राखण्यासाठी चौथी कसोटी जिंकणे अपरिहार्य होते. मात्र, पावसामुळे चौथी कसोटी पूर्ण होऊ शकली नाही आणि सामना अनिर्णीत राहीला.

वाचा: चौथा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत, भारताने मालिका जिंकली

पहिल्या दिवशी  केवळ २२ षटकांचा खेळ झाला आणि त्यानंतर सलग चार दिवस पोर्ट ऑफ स्पेनमध्ये पावसाचाच खेळ पाहायला मिळाला. चौथी कसोटी अनिर्णीत राहिल्याने याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला झाला आणि १११ गुणांसह पाकिस्तान संघ कसोटी संघांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. भारतीय संघाला ११० गुणांसह दुसरे स्थान, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला १०८ गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीच्या क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ आहे.

वाचा: सचिनच्या हस्ते पी.व्ही.सिंधूला मिळणार बीएमडब्ल्यू