*भारत विरूद्ध पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिका
*पाकिस्तानचा सहा गडी राखून भारतावर विजय
भारत विरूद्ध पाकिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने सहा गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. दरम्यान, भारताचा निम्मा संघ अवघ्या ३० धावांवर बाद झाला होता. जुनैद खानने सेहवाग, कोहली, युवराज यांना त्रिफळाबाद आणि रोहित शर्माला झेलबाद करत चार बळी मिळविले. तर इरफानने गंभीरला त्रिफळाबाद केले. यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शतकी खेळी करत संघाला २२८ धावांपर्यंत मजल मारता आली होती.  पाकिस्तान संघाने २२८ धावांचे लक्ष्य गाठण्याची सुरूवात केली असता अगदी पहिल्याचं चेंडूत भारतीय गोलंदाज भुवनेश्वरकुमारने हाफीजला बाद करत तंबूत धाडले. त्यापाठोपाठ पाकिस्तानचा दुसरा गडीही बाद झाला. परंतु पाकिस्तानचा डाव सावरत आपल्या नाबाद शानदार १०१ धावांच्या बळावर नासिर जमशेदने विजयीवाटचाल केली.
संक्षिप्त धावफलक-
भारत २२७-६
गौतम गंभीर ८ धावा,
वीरेंद्र सेहवाग ४ धावा,
विराट कोहली ० धावा,
युवराजसिंग २ धावा,
रोहित शर्मा ४ धावा,
सुरेश रैना ४३ धावा,
महेंद्रसिंह धोनी (नाबाद) ११३ धावा,
आर. अश्विन (नाबाद) ३१ धावा

पाकिस्तान २२८-४
महंमद हफिज ० धावा,
नासिर जमशेद (नाबाद) १०१ धावा,
अझर अली ९ धावा,
युनुस खान ५८ धावा,
मिसबाह-उल-हक १६ धावा,
शोएब मलिक (नाबाद) ३४ धावा