सर्वाधिक ३२ सामन्यांत अपराजित; इब्राहिमोव्हीकचे दोन गोल
झ्ॉलटन इब्राहिमोव्हीकच्या दोन गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबने लीग १ फुटबॉल स्पध्रेत सेंट इटिनेवर २-० असा विजय मिळवला. या वियजाबरोबर लीग १ स्पध्रेत सर्वाधिक ३२ सामने अपराजित राहणाऱ्या नँट्स क्लबच्या विक्रमाशी बरोरबी केली आहे. जुलै १९९४ ते एप्रिल १९९५ या कालावधीत नँट्सने हा विक्रम नोंदवला होता. गेल्या वर्षी १५ मार्चला पीएसजीने अखेरचा पराभव पत्करला होता.
‘‘या विक्रमाशी बरोबरी केल्याचा आनंद झाला आहे आणि यामुळे खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी मला मदत मिळाली आहे,’’ अशी प्रतिक्रिया पीएसजीचे प्रशिक्षक लौरेंट ब्लांस यांनी दिली.
पीएसजीने २३ सामन्यांत २० विजय आणि ३ बरोबरीतील निकालानंतर खात्यात ६३ गुण जमा केले आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या मोनॅको क्लबच्या खात्यात केवळ ३९ गुण आहेत, तर ३७ गुणांसह अँगर्स तिसऱ्या स्थानावर आहेत.