pog-hair-1472643494-800

मॅन्चेस्टर युनायटेडचा आघाडीचा फुटबॉलपटू पॉल पोग्बाची सध्या फुटबॉल विश्वाच बरीच हवा आहे. आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा पोग्बाने आता आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. फ्रान्सच्या या फुटबॉलपटूने एका विषारी सापाची प्रेरणा घेऊन तशी हेअर स्टाईल केली आहे. आपल्या अनोख्या हेअर स्टाईलचा एक व्हिडिओ पोग्बाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक बोलीसह मॅन्चेस्टर युनायटेड क्लबमध्ये समाविष्ट झाल्यानंतर पोग्बाने आपल्या हेअरस्टाईलमध्ये बदल केला. नवीन हेअरस्टाईल, नवीन जर्सी, नवा सीझन, असे ट्विट पोग्बाने केले.