पवन नेगी सर्वाधिक बोली मिळालेला भारतीय खेळाडू; शेन वॉटसनला सर्वाधिक भाव
काही दिवसांपूर्वी अपरिचित असलेला अष्टपैलू पवन नेगीने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले आणि त्याचे दिवसच बदलले. या वर्षीच्या आयपीएल लिलावामध्ये त्याचाच वरचष्मा पाहायला मिळाला आणि युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक ८.५० कोटी रुपयांची बोली पवनवर लागली. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला तो ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन. भारताविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात वॉटसनने धडाकेबाज शतक झळकावले होते आणि त्याच्या या खेळीमुळेच त्याला लिलावात सर्वाधिक भाव मिळाला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगवर या वेळी सर्वाधिक बोली लागेल, असे भाकीत वर्तवले गेले होते, पण या लिलावात त्याच्यावर सात कोटी रुपयांचीच बोली लावत सनरायझर्स हैदराबादने आपल्या ताफ्यात सामावून घेतले.
कोण आहे पवन नेगी
* छोटय़ा चणीचा डावखुरा फिरकीपटू आणि उपयुक्त फलंदाज. ५६ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये २६.२८च्या सरासरीने ४६ विकेट्स.
* सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत नेगीच्या नावावर नऊ सामन्यांत सहा विकेट्स.
* चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करताना महेंद्रसिंग धोनीचा विश्वासू साथीदार. धावा रोखण्यासह भागीदारी फोडण्यात निपुण गोलंदाज.
* मूळचा दिल्लीकर असलेल्या नेगीने आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व केले होते.
* पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने फ्रँचायजींचे लक्ष वेधून घेतले.

युवा खेळाडूंना चांगला भाव
या लिलावात युवा खेळाडूंना चांगला भाव मिळाला. करुण नायरला चार कोटी रुपये मोजत दिल्ली डेअरडेव्हिल्सने संघात स्थान दिले. युवा विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण तडफदार फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतला दिल्लीने १.९० कोटी रुपयांची बोली लावली. अष्टपैलू दीपक हुडाला सनरायझर्स हैदराबादने ४.२ कोटी रुपये मोजत संघात दाखल केले. तामिळनाडूचा युवा फिरकीपटू एम. अश्विनला ३.५ कोटी रुपयांसह रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाने संधी दिली. मुंबई इंडियन्सने दोन कोटी रुपये मोजत कृणाल पंडय़ाला संघात स्थान दिले. मुंबईकर धवल कुलकर्णीला दोन कोटी रुपये मोजत गुजरात लायन्स संघाने संधी दिली.
ब्रेथवेटला अनपेक्षित भाव
वेस्ट इंडिजचा फलंदाज कालरेस ब्रेथवेट हा जास्त कुणाला माहिती नसेलही, पण आयपीएलच्या लिलावात मात्र त्याला अनपेक्षित भाव मिळाला. लिलावासाठी त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये एवढी ठरवण्यात आली होती, पण दिल्ली डेअर डेव्हिल्सने सर्वाधिक ४.३० कोटींची बोली लावत त्याला संघात दाखल केले.
‘भाव’ नसलेले नावाजलेले खेळाडू
मार्टिन गप्तील, जॉर्ज बेली, हशिम अमला, माइक हसी, महेला जयवर्धने, ब्रॅड हॅडिन, डॅरेन सॅमी, तिलकरत्ने दिलशान, डेव्हिड हसी उस्मान ख्वाजा, अ‍ॅडम व्होग्स आणि मुनाफ पटेल.
कार्तिकचा भाव घसरला
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला गेल्या वर्षी दिल्ली डेअर डेव्हिल्सने १२ कोटी रुपये एवढी भली मोठी रक्कम मोजून संघात स्थान दिले होते. पण या वर्षीच्या लिलावात मात्र त्याला २.३ कोटी रुपयांना गुजरात लायन्सने संघात स्थान दिले.

यंदाच्या आयपीएलच्या लिलावात संघांनी घेतलेले खेळाडू आणि त्यांच्या किमतींची यादी

सनरायझर्स हैदराबाद
युवराज सिंग ७ कोटी
आशिष नेहरा ५.५० कोटी
मुस्ताफिझूर रेहमान १.४० कोटी
दीपक हुडा ४.२० कोटी
बरिंदर सरण १.२० कोटी
आदित्य तरे १.२० कोटी
बेन कटिंग ५० लाख
विजय शंकर ३५ लाख
अभिमन्यू मिथुन ३० लाख
टी.सुमन १० लाख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
शेन वॉटसन ९.५० कोटी
केन रिचर्डसन २.०० कोटी
स्टुअर्ट बिन्नी २.०० कोटी
सॅम्युअल बद्री ५० लाख
ट्रॅव्हिस हेड ५० लाख
प्रवीण दुबे ३५ लाख
विक्रमजीत मलिक २० लाख
इक्बाल अब्दुल्ला १० लाख
अक्षय कर्णेवार १० लाख
विकास टोकस १० लाख
सचिन बेबी १० लाख

रायझिंग पुणे सुपरजायंट्स
मिचेल मार्श ४.८० कोटी
एम. अश्विन ४.५० कोटी
इशांत शर्मा ३.८० कोटी
केव्हिन पीटरसन ३.५० कोटी
इरफान पठाण १.०० कोटी
थिसारा परेरा १.०० कोटी
रजत भाटिया ६० लाख
अशोक दिंडा ५० लाख
स्कॉट बोलँड ५० लाख
अ‍ॅडम झम्पा ३० लाख
पीटर हँड्सकॉम्ब ३० लाख
आर. पी. सिंग ३० लाख
इश्वर पांडे २० लाख
अंकित शर्मा १० लाख
अंकुश बैन्स १० लाख
जसकरण सिंग १० लाख
बाबा अपराजित १० लाख
दीपक चहार १० लाख

कोलकाता नाइट रायडर्स
अंकित राजपूत १.५० कोटी
जयदेव उनाडकत १.६० कोटी
जॉन हेस्टिंग्ज १.३० कोटी
जेसन होल्डर ७० लाख
कॉलिन मुन्रो ३० लाख
आर. सतीश २० लाख
मनन शर्मा १० लाख
किंग्ज इलेव्हन पंजाब
मोहित शर्मा ६.५० कोटी
कायले अबॉट २.१० कोटी
के.सी. करिअप्पा ८० लाख
मार्कुस स्टोनिअस ५५ लाख
फरहान बेहराडीन ३० लाख
प्रदीप साहू १० लाख
स्वप्निल सिंग १० लाख
अरमान जाफर १० लाख

गुजरात लायन्स
आरोन फिंच १ कोटी
प्रवीण कुमार ३.५० कोटी
ड्वेन स्मिथ २.३० कोटी
डेल स्टेन २.३० कोटी
दिनेश कार्तिक २.३० कोटी
धवल कुलकर्णी २.०० कोटी
एकलव्य द्विवेदी १.०० कोटी
अँड्रयू टाय ५० लाख
इशान किशन ३५ लाख
शदाब जकाती २० लाख
प्रवीण तांबे २० लाख
जयदेव शाह २० लाख
प्रदीप सांगवान २० लाख
अक्षदीप नाथ १० लाख
पारस डोगरा १० लाख
उमंग शर्मा १० लाख
अमित मिश्रा १० लाख
शिवाजी कौशिक १० लाख
सरबजीत लड्डा १० लाख

दिल्ली डेअरडेव्हिल्स
पवन नेगी ८.५० कोटी
ख्रिस मॉरिस ७.०० कोटी
कालरेस ब्रेथवेट ४.२० कोटी
संजू सॅमसन ४.२० कोटी
करुण नायर ४.०० कोटी
जोएल पॅरिस ३० लाख
ऋषभ पंत १.९ कोटी
सॅम बिलिंग्ज ३० लाख
पवन सुन्याल १० लाख
चामा मिलिंद १० लाख
प्रत्युश सिंग १० लाख
महिपाल लोमरुर १० लाख
अखिल हेरवाडकर १० लाख
खलील अहमद १० लाख

मुंबई इंडियन्स
जोस बटलर ३.८० कोटी
नथ्थू सिंग ३.२० कोटी
टीम साऊदी २.५० कोटी
कृणाल पंडय़ा २ कोटी
किशोर कामत १.४० कोटी
जितेश शर्मा १० लाख
दीपक पुनिया १० लाख