जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळविल्याबद्दल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व टेनिसपटू सानिया मिर्झा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. तसेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या भारतीय संघाचीही त्यांनी पाठराखण केली आहे.
‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाद्वारे राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी सायना व सानिया या दोन्ही भारतीय कन्यांनी देशाला अभिमानास्पद कामगिरी केली असल्याचे सांगितले.