मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सांगली महापालिकेच्या ७८ जागांसाठी ८६१ उमेदवारी अर्ज
- कोयना धरण ४० टक्क्यांवर भरले; कराड, पाटणला रिपरिप कायम
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- विद्यापीठ परीक्षांच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह
- चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या ३ बुकींना अटक
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
- श्रीनिवासन आगे बढो..
- ययाति आणि देवयानी
- 'फादर्स डे' विशेष : एक अटळ हळवा प्रवास
- 'नमो'नियाची बाधा
मोस्ट रीड
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आणि जगातील एक अव्वल फलंदाज रिकी पॉन्टिंग याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेला पॉन्टिंग उद्यापासून (शुक्रवार) सुरू होणा-या पर्थ येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्त होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून माझी कामगिरी असमाधानकारक असल्यामुळे मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून मी खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. चांगला सराव करून एकदिवसीय आणि लीग क्रिकेटमध्ये मी खेळत राहणार आहे, असे रिकी पॉन्टिंगने ट्विटरवर सांगितले आहे.
रिकी पॉन्टिंगने आतापर्यंत १६७ कसोटी सामन्यांमध्ये १३३६६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ४१ शतकं आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये २५७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
भारताच्या सचिन तेंडुलकरपाठोपाठ कसोटीमध्ये रिकी पॉन्टिंगने सर्वाधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, पॉन्टिगने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्याने सचिनच्या निवृत्तीबाबत पुन्हा एकदा चर्चेला जोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















