प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमातील अंतिम फेरीची लढत पाटणा पायरेट्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुण्याविरुद्धच्या संघर्षपूर्ण लढतीत गतविजेत्या पाटणाने ४ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीतील तिकीट पक्के केल्यानंतर दुसऱया उपांत्य फेरीच्या लढतीत जयपूर पिंक पँथर्सने तेलगू टायटन्सवर सहज विजय मिळवला. जयपूरने तब्बल १० गुणांच्या फरकाने तेलगू टायटन्सचा धुव्वा उडवला. सामन्याच्या सुरूवातीला दोन्ही संघांमध्ये तशी बऱयापैकी चढाओढ पाहायला मिळाली होती. मात्र, जयपूरने तेलगू टायटन्सच्या संघाला दोनवेळा ऑल आऊटकरून सामन्यावर पकड निर्माण केली. अखेरीस जयपूरने आपली आघाडी कायम राखत १० गुणांनी विजय प्राप्त करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
जयपूरकडून कर्णधार जसवीर सिंगने सर्वाधिक गुणांची कमाई केली, त्याला सामन्याचा सर्वोत्कृष्ट चढाईपटू आणि सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले, तर अमित हुडाला सर्वोत्कृष्ट बचावपटूचा मान मिळाला. रविवारी रात्री आठ वाजता पाटणा पायरेट्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात अंतिम फेरीची लढत रंगणार आहे.

MATCH UPDATES-

# जयपूरचा अंतिम फेरीत सामना पाटणा पायरेट्सची होणार

# जयपूर पिंक पँथर्सची तेलगू टायटन्सवर १० गुणांनी मात, अंतिम फेरीत प्रवेश

# शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी, जयपूरकडे ११ गुणांची आघाडी.

# जयपूरकडून राहुल चौधरीला सुपर टॅकल, जयपूरच्या खात्यात दोन गुणांची वाढ.

# तेलगू टायटन्सच्या राहुल चौधरीची अप्रतिम चढाई, दोन गुणांची कमाई. तरीही जयपूरकडे भक्कम आघाडी.

# जयपूरच्या राजेश नरवालकडून यशस्वी चढाई, दोन गुणांची कमाई

# शेवटच्या १० मिनिटांचा खेळ बाकी आणि जयपूरकडे १२ गुणांची आघाडी

# तेलगू टायटन्स संघाकडून पुन्हा एकदा निराशा, जयपूरकडून दुसऱयांदा ऑल आऊट.

# मध्यांतरानंतरच्या खेळात जयपूर पिंक पँथर्सकडे भक्कम आघाडी, जयपूर २२-१३ तेलगू टायटन्स

# यजमान तेलगू टायटन्स ऑल आऊट, जयपूरची आघाडी. जयपूर १७-१३ तेगलू टायटन्स

# जयपूरकडून आक्रमक खेळ, तेलगू टायटन्सवर ऑल आऊटचे सावट

# मध्यांतरानंतरच्या तीन मिनिटांच्या खेळानंतर गुणतालिका: जयपूर ११-११ तेलगू टायटन्स

# मध्यांतरानंतरच्या खेळाला सुरूवात, तेलगू टायटन्सचे पलटवार. दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी

# मध्यांतरानंतर कोण बाजी मारणार? जयपूर की तेलगू टायटन्स?

# मध्यांतरापर्यंतच्या खेळात दोन्ही संघांमध्ये फक्त एका गुणाचा फरक, जयपूर पिंक पँथर्स ११-१० तेलगू टायटन्स

# जयपूर आणि तेलगू टायटन्समध्ये गुणांसाठी चढाओढ, जयपूर ९-८ तेलगू टायटन्स

# सामन्याला सुरूवात, दोन्ही संघांकडून आक्रमक खेळी

# देशाचा कौल-

# पहिला उपांत्य फेरीचा सामना पाटणाने जिंकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. आता जयपूर पिंक पँथर्स आणि तेलगू टायटन्स सामन्यात कोण जिंकणार याकडे साऱयांचे लक्ष