प्रो कबड्डीच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठलेल्या पुणेरी पलटणचा गतविजेच्या पाटणा पायरेट्सने पराभव केला. पुण्याविरुद्धच्या विजयासह पाटणाने पुन्हा एकदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, अखेरच्या क्षणी पाटणाने बाजी मारत पुण्यावर चार गुणांनी विजय प्राप्त केला.
सामन्याच्या अगदी पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांमध्ये गुणांसाठी चढाओढ पाहायला मिळाली होती. मध्यांतरापर्यंत पाटणाने पुण्यावर तीन गुणांची आघाडी नोंदवली होती. मात्र, मध्यांतरानंतर पुण्याच्या संघाने पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. शेवटच्या दहा मिनिटांचा खेळ बाकी असताना पुण्याने पाटणाला ऑल आऊट करून चार गुणांची आघाडी घेतली होती. पण ही आघाडी पुण्याला कायम राखता आली नाही आणि पाटणाने मोक्याच्या क्षणी दमदार खेळ करून पुण्याच्या संघाला ऑल आऊट करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

UPDATES:

      • अखेरच्या क्षणी पुणेरी पलटणचा संघ ऑल आऊट, पाटणाने घेतली आघाडी. पाटणा ३७-३३ पुणे</li>
      • शेवटच्या चार मिनिटांचा खेळ बाकी आणि दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी
      • कुलदीपची यशस्वी चढाई, पुणे २८-२५ पाटणा
      • पुण्याची ४ गुणांची आघाडी, शेवटच्या आठ मिनिटांचा खेळ बाकी
      • पुण्याचे मोक्याच्या क्षणी पुनरागमन, पाटणाचा संघ ऑल आऊट
      • पाटणाचा पाचवा सुपर टॅकल, पाटणा २२-१९ पुणे
      • शेवटच्या दहा मिनिटांचा खेळ बाकी, पाटणा तीन गुणांनी आघाडीवर
      • गुणतालिका: पाटणा २२-१८ पुणे
      • पाटणाच्या कुलदीपकडून सुपर टॅकल, पाटणाची आघाडी.
      • मध्यांतरानंतर पुण्याचे पुनरागमन, दोन्ही संघांच्या गुणांची बरोबरी
      • दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ, पाटणाच्या राजेश मोंडलची यशस्वी चढाई
      • मध्यांतरानंतरच्या खेळाला सुरूवात
      • सामन्याच्या मध्यांतरापर्यंतची गुणतालिका पुणे १३-१६ पाटणा
      • पुण्याकडून सुपर टॅकल, पुण्याच्या खात्यात दोन गुण. पुणे ११- १५ पाटणा.
      • पुण्याच्या पाठोपाठ पाटणाकडून लागोपाठ दोन वेळा सुपर टॅकल, पाटणाची आघाडी
      • पुण्याच्या सुरजित सिंगकडून सुपर चढाई, तीन गुणांची कमाई.
      • पाटणाकडून सुरजित सिंगची यशस्वी चढाई, दोन गुणांसह घेतली आघाडी. पटणा- ४, पुणे- ३ गुण
      • पुण्याच्या बजाव फळीची दमदार कामगिरी, पुण्याची आघाडी
      • उपांत्य फेरीच्या सामन्याचा थरार अनुभवताना अभिनेत्री चित्रांगदा सिंग-

    • पुण्याच्या दिपक हुडाकडून दमदार चढाई, एका गुणाची कमाई
    • पटणाची दुसऱया चढाईत दोन गुणांची कमाई, राजेश मोंडलने मिळवून दिले यश
    • बोनस गुणासह पुण्याने उघडले खाते
    • सामन्याला सुरूवात, स्टेडियमवरील उत्सुकता शिगेला.
    • देशाचा कौल-

  • राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ सज्ज, अभिनेत्री चित्रांगदा सिंगच्या आवाजात राष्ट्रगीताचे गायन
  • पुण्याच्या पाठोपाठ पटणाचा संघ देखील मैदानात दाखल.
  • पुणेरी पलटणचा संघ मैदानात दाखल.
  • हैदराबादच्या गचीबोवली स्टेडियमवर उपांत्य फेरीचा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षक सज्ज.