अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. सध्या युक्रेन हा या दोन देशांतील संघर्षबिंदू होता. मात्र बुधवारी अमेरिकेच्या पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे फिफाच्या अधिकाऱ्यांना ज्युरिच, स्वित्र्झलड येथे अटक करण्यात आली. फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या फिफा संघटनेचा खरा चेहरा या कारवाईमुळे समोर आला. जागतिक फुटबॉलला हादरवणाऱ्या या घटनेचे स्वागत करण्याऐवजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचा निषेध केला आहे. ‘‘वॉशिंग्टनतर्फे फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांची हकालपट्टी करण्याचा हा डाव आहे. २०१८ च्या विश्वचषकाचे आयोजन रशियाला मिळू नये यासाठीच ही कारवाई करण्यात आली. फुटबॉलविश्वातील देशांवर हुकमत गाजवण्याचा अमेरिकेचा हा छुपा प्रयत्न आहे,’’ असे पुतिन यांनी सांगितले.