डब्ल्यूडब्ल्यूईच्या व्यासपीठावरील मल्ल राहुल बोडकेने ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीला दुबईत दिलेल्या मुलाखतीत आपण महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी स्पर्धा जिंकल्याचा दावा केला होता. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी राहुल बोडकेविरुद्ध कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘‘राहुल बोडके हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत आहे. त्याने साधी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकलेली नाही, तर हिंद केसरी दूरच राहिली. त्याने खोटी माहिती देऊन कुस्तीप्रेमींची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध राज्य संघटना कारवाई करणार आहे,’’ अशी प्रतिक्रिया लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे नाशिक विभागीय चिटणीस गोरखनाथ बलकवडे यांनीसुद्धा याबाबत संताप व्यक्त केला आहे. खोटे बोलण्याची राहुलची सवय जुनीच असून त्याच्यामुळे नाशिक तसेच कुस्ती बदनाम होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे.

‘‘राहुल हा मुळात कुस्तीपटूच नसल्याचा दावाही बलकवडे यांनी केला आहे. आजपर्यंत राहुलने राज्य काय, परंतु परिषदेच्या आणि तालीम संघाच्या तालुका स्पर्धामध्येही कधी सहभाग घेतलेला नाही. विजेतेपद तर दूरची गोष्ट आहे. कुस्तीला बदनाम करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय परिषदेने याआधीच घेतलेला असल्याने राहुलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल,’’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Bhaskar Jadhav On MNS Raj Thackeray
‘मनसेने महायुतीला पाठिंबा दिला की द्यायला लावला?’, भास्कर जाधव यांचा सवाल

Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं

Rohit Pawar, crab
आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी

Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल