ऑस्ट्रेलियाला ५-० च्या फरकाने पराभूत करुन व्हाईटवॉश देण्याचे भारताचे मनसुबे फोल ठरु शकतात. कारण बंगळुरु येथे होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने पुढच्या २४ ते ४८ तासात बंगळुरुत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या २४ तासात शहराच्या अनेक भागांमध्ये ५४ मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चिन्नास्वामी स्टेडीयमचे क्युरेटर खेळपट्टी सुकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मैदान सुकवण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडीयमवर अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुसळधार पावसानंतरही मैदान सुकवण्यासाठी मदत होते. मात्र हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा पाहता या सामन्यावरचे चिंतेचे काळे ढग अजुनही कायम आहेत.

अवश्य वाचा – इंदूरच्या मैदानावर विक्रमांचा दुहेरी षटकार

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला पावसाचं ग्रहण लागलेलं दिसतं आहे. कोलकात्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यातही मुसळधार पावसामुळे दोन्ही संघांना सराव करता आला नव्हता. तर पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे २१ षटकांचा सामना खेळवण्यात आला. इंदूरच्या सामन्यावरही पावसाचं सावट होतं, मात्र सुदैवाने सामन्यादरम्या पावसाने हजेरी लावली नाही.

सध्या भारत या मालिकेत ३-० ने आघाडीवर आहे. या विजयासह भारत आयसीसीच्या जागतीक वन-डे क्रमवारीत पहिल्या क्रमाकांवर पोहचला आहे. भारताला जर आपलं पहिलं स्थान कायम राखायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ५-० ने जिंकण गरजेचं आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात पावसाने हजेरी लावू नये अशी प्रार्थना सध्या सर्व क्रिकेटरसिक करतायत.

अवश्य वाचा – यहां के हम सिकंदर! वन-डे क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर