भारताचा अव्वल मानांकित खेळाडू सोमदेव देववर्मनला कोलकाता खुल्या टेनिस स्पर्धेत रामकुमार रामनाथन या युवा खेळाडूने पराभवाचा धक्का दिला. रामकुमार याने हा सामना ४-६, ६-३, ६-४ असा जिंकला. सोमदेवने नुकतेच दिल्ली खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. त्याच्याविरुद्ध रामकुमार या २० वर्षीय खेळाडूने पहिला सेट गमावल्यानंतर बहारदार खेळ करीत विजयश्री खेचून आणली. रामकुमारला आता सर्बियाच्या मिकी यांकोवीच याच्याशी गाठ पडणार आहे. युकी भांब्रीने स्पेनच्या एन्रिक लोपेझ पेरेझ याच्यावर ६-२, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. भांब्री याला मोल्दोवाच्या रादु अल्बोट याच्याशी खेळावे लागणार आहे.