चेतेश्वर पुजाराने त्रिशतक झळकावत आपली भारतीय एकदिवसीय संघातील निवड सार्थ ठरवली. सौराष्ट्रने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कर्नाटकचा पहिला डाव ३९६ धावांत आटोपला आणि सौराष्ट्रला आघाडी मिळाली. ३ बाद ४६३ वरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रने दुसऱ्या डावात ७१८ धावांचा डोंगर उभारला. पुजाराने तब्बल ४९ चौकार आणि एका षटकारासह ३५२ धावा केल्या. शेल्डॉन जॅक्सनने ११७ धावा केल्या.
तरुवरच्या त्रिशतकामुळे पंजाब उपांत्य फेरीत
जमशेदपूर : तरुवर कोहलीच्या त्रिशतकाच्या जोरावर पंजाबने झारखंडवर पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. पंजाबने गुरुवारी ३ बाद ६९९ डावांवर आपला डाव घोषित केला. तरुवर कोहलीने ३४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३०० धावांची मॅरेथॉन खेळी केली. मनदीप सिंगचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले. पंजाबला पहिल्या डावात २९८ धावांची आघाडी मिळाली. झारखंडने दुसऱ्या डावात बिनबाद ३३ धावा केल्या. उपांत्य फेरीत पंजाबची लढत सौराष्ट्रशी होणार आहे.