ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रणजिब बिस्वाल यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आह़े  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी जगमोहन दालमिया यांच्या नियुक्तीनंतर आयपीएल समितीत बदल होण्याची अपेक्षा होती, परंतु बिस्वाल यांच्यासह समितीत कोणताही बदल न करण्याचा निर्णय तूर्तास तरी घेण्यात आला आह़े
‘‘पूर्व विभागाने संघटित राहण्याची आवश्यकता आह़े  दालमिया यांना बिस्वाल यांचा पाठिंबा होता आणि आयपीएलच्या प्रमुखपदी राहण्यास आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत़़,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितल़े बंगाल क्रिकेट असोसिएशनचे कोषाध्यक्ष बिस्वरूप डे यांची दालमिया यांचे कार्यकारी साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आह़े