फुटबॉल विश्वातील अतिशय महत्त्वाच्या ला-लिगा चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद जिंकणाऱ्या रियल माद्रिद संघातील खेळाडू सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहेत. २०१२ नंतर म्हणजेच तब्बल पाच वर्षांनी हा खिताब जिंकल्यानंतर सध्या खेळाडू सुट्टी एन्जॉय करत आहेत. अनेक जणांनी आपल्या फॅमिलीसोबत बीचवर सुट्टीची मजा लुटली. तर काही खेळाडूंनी संघ सहकारी, गर्लफ्रेंडसोबत सुट्टीचा मनमुराद आनंद लुटला.

फुटबॉलचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यात चॅम्पियन रियल माद्रिदच्या संघाच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. ला-लिगा स्पर्धेचे जेतेपद पटकावून या संघातील खेळाडूंनी आपल्या चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. पुढची स्पर्धा कधी आणि कुठे होणार आणि त्यात आपल्या आवडता संघ आणि खेळाडूंचा सहभाग असेल की नाही, याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. तसेच स्पर्धा संपल्यानंतर खेळाडू काय करतात? त्यांचे हॉलिडे सेलिब्रेशन कसे असते, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. रियल माद्रिदच्या खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांसाठी असेच धम्माल फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यांनी आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, तसेच पार्टनरसोबतचे हॉलिडे सेलिब्रेशनचे काही फोटो ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट केले आहेत. संघाचा कर्णधार सेर्जिओ रॅमोस, किलोर नॅव्हास, लुकास यांनी आपल्या पार्टनरसोबत घालवलेला आनंदाचा क्षण शेअर केला आहे. तर स्टार स्ट्रायकर ख्रिस्तीयानो रोनाल्डो यानेही आपला रिलॅक्स मूडमधील फोटो शेअर केला आहे. जेम्स रॉड्रीग्ज, करिम बेन्झेमा यांनीही काही फोटो शेअर केले आहेत. बेन्झेमा याने पियानो वाजवतानाचा फोटो पोस्ट केला आहे. बेन्झेमा याने आपल्या गर्लफ्रेंडसोबतचा एन्जॉयमेंटचा खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ‘जगातील सर्वात सुंदर महिला’ असे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला म्हटले आहे. मॅटेओने आपल्या मित्रांसोबत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटला.

https://www.instagram.com/p/BUp_Z0ngor4/