मधल्या फळीतील खेळाडू रितू राणीला आगामी जागतिक हॉकी लीग (दुसरी फेरी) स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही स्पर्धा ७ ते १५ मार्च दरम्यान येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर होणार आहे.
भारताच्या १८ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला असून दीपिकाकुमारीकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतास ‘अ’ गटात पोलंड, घाना व थायलंड यांच्याशी खेळावे लागणार आहे. ‘ब’ गटात मलेशिया, रशिया, कझाकिस्तान व सिंगापूर यांचा समावेश आहे. ७ मार्च रोजी भारताचा घाना संघाशी सामना होणार आहे.
भारतीय संघ
गोलरक्षक- सविता, रजनी एतिमारपू, बचावफळी- दीपग्रेस एक्का, दीपिकाकुमारी (उपकर्णधार), नमिता टोप्पो, जसप्रीत कौर, सुनिता लाक्रा. मध्यरक्षक- रितू राणी (कर्णधार), सुशीला चानू, लिलिमा मिंझ, नवज्योत कौर, मोनिकाकुमारी. आघाडी फळी- राणीकुमारी, पूनम राणी, अनुपा बार्ला, सौंदर्या येंदळा, अमनदीप कौर, वंदना कटारिया.