२०१६ रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेत असल्याचे जाहीर करत टेनिसपटू रॉजर फेडरर याने आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. टेनिसचा बादशहा अशी ओळख असलेला रॉजर गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या दुखापतीमुळे रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेण्याचे रॉजरने जाहिर केले आहे. रिओमध्ये होणा-या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचे प्रतिनिधीत्त्व न करण्याचे त्याने जाहीर केले आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी आपल्याला न खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पूर्ण बरा होईपर्यंत मी खेळणार नाही असेही त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले. २०१६ मध्ये कोणताही सामना खेळणार नाही, परंतु २०१७ मध्ये मी पूर्ण बरा होईन आणि चांगली कामगिरी करून दाखवेल असेही त्यांनी म्हटले.  आतापर्यंत १७ वेळा ग्रँडस्लॅम किताब फेडररने पटकावून टेनिसमध्ये अव्वल स्थान मिळले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्यांच्या दुखापतीमुळे तो त्रस्त होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गुघड्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्याला फ्रेंच ओपन स्पर्धेलाही मुकावे लागले होता. जूनमध्ये विम्बल्डन स्पर्धेतही त्याला विजेतेपद जिंकता आले नव्हते. फेडररने वर्षभर टेनिसपासून लांब राहण्याचा निर्यण घेतला आहे त्यामुळे त्याची उणीव चाहत्यांना नक्की जाणवेल.