रॉस टेलरच्या विक्रमी शतकाच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सहा धावांनी रोमहर्षक विजय संपादन केला.

टेलरने ८ चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने २९० धावांचे लक्ष्य उभारले. दक्षिण आफ्रिकेचे एकेक फलंदाज बाद होत गेल्याने विजयाच्या आशा मंदावल्या होत्या. मात्र ड्वेन प्रीटोरियसने २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र दक्षिण आफ्रिकेची सलग १२ सामन्यांत विजयाची मालिका न्यूझीलंडने खंडित करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
LSG vs DC IPL 2024 : आयुष बडोनीने एमएस धोनीच्या खास विक्रमाशी साधली बरोबरी, ‘या’ विशेष यादीत झाला सामील
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

डावाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकून टेलरने नाटय़मयरीत्या आपले शतक पूर्ण केले. याचप्रमाणे न्यूझीलंडकडून सर्वाधिक १७ शतके झळकावण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. नॅथन अ‍ॅस्टलने १६ शतके साकारली आहेत.

बरोबरीची कोंडी फोडण्याचे हरिकासमोर आव्हान

तेहरान : भारतीय ग्रँडमास्टर डी. हरिकाने जागतिक महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी गमावली. या सामन्यातील दुसऱ्या डावात हरिकाने जॉर्जियाच्या नाना डाग्निझेकडून पराभव पत्करला.

हरिकाने पहिला डाव जिंकल्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने दुसऱ्या डावात किमान बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. मात्र प्रारंभीपासून तिला दडपण झुगारण्यात अपयश आले. आता कमी वेळेचा आणखी एक सामना या दोघांना खेळावा लागणार आहे. चीनच्या नवव्या मानांकित टॅन झोंगयीने काळ्या मोहऱ्यांसह धक्कादायक विजयाची नोंद केली. तिने अव्वल मानांकित जू वेनजूनला नामोहरम केले. या दोघींमधील पहिला डाव हा बरोबरीत सुटला.

 

मिताली, हरमनप्रीतला अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान

नवी दिल्ली : भारताच्या महिला फलंदाज मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत अव्वल दहा जणींच्या यादीत स्थान मिळवले आहे. भारताची कर्णधार मिताली महिला फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, तर विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या हरमनप्रीतने महिलांच्या फलंदाजीच्या यादीत दहावे स्थान पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग्स ८०४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर मितालीने ७३३ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे. दहाव्या स्थानावरील हरमनप्रीतच्या खात्यात ५७४ गुण आहेत. भारताची डावखुरी फिरकीपटू एकता बिश्त नवव्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शिखा पांडे आणि दीप्ती शर्मा या अनुक्रमे १९व्या आणि २०व्या स्थानावर आहेत.