01-sachin-tendulkarभारतीय क्रिकेटप्रेमींचा देव अशी ज्याला उपाधी दिली जाते त्या महान क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस. १९७३ साली २४ एप्रिलला मुंबईत जन्मलेल्या सचिनच्या जीवनातील काही लक्षवेधी क्षण छायाचित्ररुपात त्याच्या वाढदिवसानिमित्त खास ‘लोकसत्ता ऑनलाईन’च्या वाचकांसाठी येथे देत आहोत. त्याचबरोबर आठवणीतील काही किस्सेदेखील येथे देण्यात आले आहेत. (Photo Source: Express archive)

02-sachin-tendulkarभारताने क्रिकेटमधील पहिला विश्वचषक २५ जून १९८३ मध्ये जिंकला होता. तर १९९९ मध्ये पुन्हा एकदा भारत विश्वचषकावर नाव कोरेल, असा अनेकांचा दावा होता. याचे कारण म्हणजे इंग्लडमध्ये खेळलेल्या अनेक क्रिकेट सामन्यात भारताने विजय प्राप्त केल्याचा इतिहास होता. सचिनदेखील खेळण्यासाठी फिट असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु १९९९ विश्वचषकाच्या क्रिकेट सामन्यादरम्यान सचिनला कंबरेच्या दुखण्याने ग्रासले होते आणि तो जमिनीवरच झोपत असे. (Photo Source: Sachin Tendulkar)

03-sachin-tendulkar१९ मे १९९९ रोजी सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ही दुःखद वार्ता समजताच सचिन तातडीने मुंबईला निघून आला. सचिनविना भारतीय क्रिकेट संघ चांगली कामगिरी करण्यास असमर्थ ठरला. झिंम्बाब्वेबरोबरच्या सामन्यात भारताला केवळ ३ विकेटने हार पत्करावी लागली होती. (Photo Source: Express archive)

04-sachin-tendulkarवडिलांच्या मृत्यूने शोकाकूल झालेल्या सचिनला आईने हिंमत दिली. मॅच खेळण्यासाठी तिने सचिनला इंग्लंडला परत जाण्यास सांगितले. जेव्हा सचिन केनियाविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उतरला, तेव्हा उपस्थितांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली. या सामन्यात सचिनने १४० धावा ठोकल्या आणि आकाशाकडे पाहून हे शतक आपल्या वडिलांना समर्पित केले. (Express photo by Prashant Nadkar)

05-sachin-tendulkar१९९५ मध्ये सचिन आणि अंजलीचे लग्न झाले. त्यावेळचे हे अतिशय सुंदर छायाचित्र. (Photo Source: Express Photo by Srinivas)

06-sachin-tendulkar२०१४ साली सचिनला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Photo Source: Express Photo by Neeraj Priyadarshi)

07-sachin-tendulkarकपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीनसह सचिनचे एक जुने छायाचित्र. (Photo Source: Express archive)

08-sachin-tendulkarवानखेडेवरील वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यावेळी टिपलेले सचिनचे हे छायाचित्र. कारकिर्दितील त्याचा हा शेवटचा कसोटी सामना होता. (Photo Source: Express photo by Neeraj Priyadarshi)

09-sachin-tendulkar२०११ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यावर बसवून संपूर्ण मैदानभर फिरविले. (Photo Source: Express Photo by A. Srinivas)

10-sachin-tendulkarबॉलिवूडमधील स्टार्ससमवेत सचिन आणि कपिल देव. (Photo Source: Express archive)

11-sachin-tendulkarनाना पाटेकर, मोहम्मद अझरुद्दीनसह, कपिल देव, संगीतकार नदीम आणि इतरांसोबत सचिन तेंडुलकरचे छायाचित्र. (Photo Source: Express archive)

12-sachin-tendulkar२०१५ मध्ये ‘बीएमडब्लू १८’ कार लॉन्चच्या वेळचे सचिनचे छायाचित्र. (Photo Source: Express Photo by Prashant Nadkar)