संसदेमध्ये गेल्यावर जनतेचे प्रश्न मांडून त्यांचे समाधान केले जावे, अशी माफक अपेक्षा देशवासीय करत असतात. पण प्रश्न मांडण्यासाठी संसदेची पायरी चढणे गरजेचे असते, तेच भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला फारसे जमलेले नाही. पण गुरुवारी मात्र संसदेमध्ये अलभ्य सचिनदर्शनाचा योग आला आणि सारेच त्याला पाहून भारावून गेले. संसदेमध्ये नव्या मोसमाचा गुरुवारी पहिला दिवस होता, त्याचे औचित्य साधत सचिनने हजेरी लावली होती.
सचिनची एप्रिल २०१२मध्ये राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत सचिनने क्रीडा क्षेत्राचे कुठलेही प्रश्न मांडलेले नसले तरी त्याला भेटण्यासाठी खासदारांनी एकच गर्दी केली होती. सचिनला भेटावे, हस्तांदोलन करावे, यासाठी खासदारांमध्ये चुरस होती.
गेल्या मोसमात १९ दिवस संसदेचे कामकाज चालले होते, त्यापैकी फक्त तीन दिवस सचिन उपस्थित राहिला होता. गेल्या हिवाळी अधिवेशनात २२ दिवस कामकाज झाले होते, तेव्हाही सचिन तीन दिवस उपस्थित राहिला होता. सचिनने अजूनपर्यंत क्रीडाविषयक प्रश्न पोटतिडिकीने मांडले नसून क्रीडा क्षेत्राला ‘अच्छे दिन’ कधी येणार, हाच प्रश्न क्रीडा चाहत्यांच्या मनात आहे.

सचिन तेंडुलकरचे ४३व्या वर्षात पदार्पण
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज (शुक्रवार) ४२व्या वर्षांत पदार्पण करत आहे. सचिनने १६ महिन्यांपूर्वी क्रिकेटला अलविदा केला होता. त्यानंतर सचिनने ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र लिहून प्रकाशित केले होते. यंदाच्या विश्वचषकाचा सचिन हा सदिच्छादूत होता.