गतविजेत्या सांगली व पुणे जिल्हा यांना शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या ६१व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील साखळी गटात अनुक्रमे पुरुष व महिला विभागात सोपे आव्हान आहे.
धनकवडी गावठाण येथे होणाऱ्या या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. पुरुष विभागात सांगलीला साखळी गटात नंदुरबार, नाशिक व जालना यांच्याशी खेळावे लागणार आहे. महिलांमध्ये पुण्यास औरंबागाद, सिंधुदुर्ग यांच्याशी लढत द्यावी लागेल.
 स्पर्धेतील पुरुष गटात २५ जिल्ह्य़ांचे संघ सहभागी झाले आहेत तर महिलांमध्ये १९ संघ उतरले आहेत. स्पर्धेसाठी चार क्रीडांगणे उभारण्यात आली आहेत.

सहभागी संघांची गटवार विभागणी
पुरुष विभाग – अ गट : सांगली, नंदुरबार, नाशिक, जालना. ब गट : मुंबई उपनगर, सातारा, परभणी, हिंगोली. क गट : पुणे, धुळे, लातूर, नांदेड. ड गट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, औरंगाबाद. ई गट : मुंबई शहर, रायगड, बीड, सोलापूर. फ गट : ठाणे, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, पालघर.
महिला विभाग – अ गट : पुणे, औरंगाबाद, सिंधुदुर्ग. ब गट : मुंबई उपनगर, सातारा, रायगड, पालघर. क गट : कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना. ड गट : मुंबई शहर, नाशिक, अहमदनगर, परभणी. ई गट : रत्नागिरी, ठाणे, बीड, नांदेड.