श्रीलंकेचा फिरकीपटू सचित्रा सेनानायकेच्या गोलंदाजी शैलीची चाचणी आयसीसीच्या चेन्नई येथील केंद्रामध्ये होणार आहे. संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे सेनानायकेवर आयसीसीने निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे त्याला आयसीसीच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.
सेनानायकेने आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला असून श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीने त्याला मान्यता दिली आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक जेरोम जयारत्ने यांनी दिली आहे.
गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करण्यासाठी सेनानायके ऑगस्ट महिन्यामध्ये पर्थ येथील पश्चिम ऑस्ट्रेलिया विद्यापीठामध्ये गेला होता. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीची चाचणी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठामध्ये करण्यात आली होती. जुलै महिन्यामध्ये संशयास्पद शैलीबाबत सेनानायकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.