21 August 2017

News Flash

पाकिस्तानात चालता हो; फुटिरतावादी मिरवाईजवर गंभीर भडकला

मिरवाईजने पाकिस्तानी संघाला शुभेच्छा दिल्या होत्या

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 11:22 AM

गौतम गंभीर (संग्रहित छायाचित्र)

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने या विजयाबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केले आहे. मात्र पाकिस्तानी संघाचे अभिनंदन करणाऱ्या मिरवाईजच्या ट्विटमुळे वाद झाला आहे. मिरवाईज उमर फारुखच्या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले आहे.

‘आसपासच्या परिसरात फटाके फोडले जात आहेत. ईद काही दिवस आधीच साजरी केली जात आहे, असे वाटते आहे. चांगला खेळ करणारा संघ जिंकला. पाकिस्तानी संघाचे अभिनंदन,’ असे ट्विट हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने केले आहे. मिरवाईजच्या ट्विटला गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिले आहे. मिरवाईजचे ट्विट ‘गंभीर’पणे घेत गौतमने त्याला थेट पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला आहे.

‘मिरवाईज सीमारेषा का ओलांडत नाही? तुला तिथे चांगले (चायनीज) फटाके मिळतील ? ईद तिथे साजरी केली जाते. मी तुम्हाला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करेन,’ असे प्रत्युत्तर गौतम गंभीरने केले. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे. मिरवाईजने याआधी पाकिस्तानी संघाने अंतिम फेरी गाठल्यावर अभिनंदनाचे ट्विट केले होते. पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केल्यावर मिरवाईजने पाकिस्तानचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

First Published on June 19, 2017 11:22 am

Web Title: separatist leader mirwaiz congratulates pakistan over win gautam gambhir asks him to cross border
 1. Y
  yug
  Jun 19, 2017 at 11:54 am
  फुटीरवादी म्हणजे पाकिस्तानीचं .देशद्रोही लोकांची भली मोठी फळी या देशात उपलब्ध आहे ती तोडल्याशिवाय या देशात स्थर्य प्राप्त होणे मुश्किल आहे .जे आपल्या देशाचे नाहीत त्या सापांना आपण पाळून ठेवले आहे .यांना असे ठणकावून आणि हुसकून लावले नाही तर हे लोक हिंदुस्थानला डोईजड होतील .
  Reply
 2. P
  PRAVIN
  Jun 19, 2017 at 11:53 am
  ekdam barobar pratikriya ahe Gambhir chi..Excellent. He dukra khatat deshche an gatat pakistanche
  Reply