फिफा अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी गुरुवारी फिफाशी संलग्न असलेल्या सहा महासंघांच्या प्रमुखांशी चर्चा केल्याचे, सूत्रांनी सांगितले आहे. या बैठकीत युईएफएचे प्रमुख मिचल प्लॅटिनी यांच्यासह आशिया फुटबॉल महासंघ (एएफसी), सीओएनएमईबीओएल (दक्षिण अमेरिका), सीएएफ (आफ्रिका), ओएफसी (ओशियाना) आणि सीओएनसीएसीएएफ (उत्तर, मध्य अमेरिका आणि कॅरेबिन) यांचीही उपस्थिती होती.  या बैठकीमागचे कारण अद्याप समोर आले नसले तरी युईएफसने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केल्याचे समजते. या मागणीला सीएएफने विरोध दर्शविला. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत ब्लाटर यांच्याविरोधात जॉर्डन प्रिन्स अली हुसेन उभे आहेत.