स्टुअर्ट बिन्नीच्या मध्यमगती माऱ्यापुढे पूर्व विभागाच्या फलंदाजांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली. फॉलोऑन स्वीकारणाऱ्या पूर्व विभागाचे दिवसभरात १४ बळी दक्षिण विभागाने घेतले. त्यामुळे दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशीच दक्षिणेने डावाने विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
पहिल्या दिवशीच्या ९ बाद २३६ धावसंख्येवरून पुढे सुरू करणाऱ्या दक्षिणेचा पहिला डाव सकाळी २६४ धावांवर आटोपला. अभिमन्यू मिथुनने २३ धावा केल्या. त्यानंतर पूर्वेचा पहिला डाव ८४ धावांत कोसळला. बिन्नीने १३ षटकांत २४ धावांत ४ बळी घेतले. १८० धावांच्या आघाडीमुळे दक्षिणेचा कर्णधार रंगनाथन विनय कुमारने प्रतिस्पध्र्याना फॉलोऑन दिला. पण त्यानंतर पूर्वेची दुसऱ्या डावातसुद्धा ४ बाद ३० अशी केविलवाणी अवस्था झाली. यापैकी बिन्नीने ७ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग (पहिला डाव) : १०१.१ षटकांत सर्व बाद २६४ (रॉबिन उथप्पा १२०; लक्ष्मी रतन शुक्ला ४/४०)
पूर्व विभाग (पहिला डाव) : ४७.४ षटकांत सर्व बाद ८४ (स्टुअर्ट बिन्नी ४/२४, प्रग्यान ओझा ३/९) आणि फॉलोऑननंतर (दुसरा डाव) : १५ षटकांत ४ बाद ३० (स्टुअर्ट बिन्नी ३/७).