क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेल्या नेमबाज जीतू राय याने खेलरत्न पुरस्कार हा आपल्यासाठी कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तो म्हणाला की, खेलरत्न पुरस्काराने माझा गौरव करण्याच आला याचा मला अभिमान आहे. पुढील काळात माझी कामगिरी उंचावण्यासाठी हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये माझी आश्वासक सुरूवात झाली होती. मात्र, अंतिम फेरीत मी माझ्या खेळीला योग्य न्याय देऊ शकलो नाही. यापुढे आणखी खडतर मेहनत घेऊन सर्वोत्तम कामगिरी करण्याची माझी पूर्ण तयारी आहे, असेही तो पुढे म्हणाला.

वाचा: …म्हणून विनेश फोगटचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती मंचावरून खाली उतरले

२९ वर्षीय जीतू राय याने रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मी. एअर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत उल्लेखनीय कामगिरी करून अंतिम फेरीत स्थान प्राप्त केले होते. मात्र, अंतिम फेरीत त्याला ८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. आज क्रीडा दिनाच्या निमित्ताने देशातील क्रीडारत्नांचा खेलरत्न, द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जीतू रायसोबत बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाचा: देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; सिंधू, दीपा, साक्षी आणि जीतू रायला ‘खेलरत्न’ प्रदान