नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य सबज्युनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेच्या १५ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या श्रुती पाताडे, उर्वी सरदेसाई यांनी विजयी आगेकूच केली. श्रुतीने केतकी मुंडीवालेवर ८-१५, १५-१४, १५-१२ असा विजय मिळवला. उर्वीने श्रुती चोखणदारेचा १५-१४, १५-१० असा पराभव केला. नमिता शेट्टीने राधा नयसेचा १५-३, १५-४ असा धुव्वा उडवला. दीक्षा हरदासानीने रुद्रा राणेवर १५-९, १५-१३ अशी मात केली. कृष्णा थोरातने अमृता गाडेकरला १५-५, १५-८ असे नमवले. सई गुल्हाणने पवित्रा सोमानीवर १५-८, १५-११ असा विजय मिळवला. कल्याणी पुंडलिकने गौरी धोटेवर मात केली. शची जुकरने नेहा भारवानीला १५-४, १५-७ असे नमवले. तिआ मिश्राने सान्या ठाकूरवर १५-६, १५-८ असा विजय मिळवला.

फुटबॉल : सेंट जोसेफ विजयी
मुंबई : एमएसएसए-मुंबई इंडियन्सतर्फे आयोजित वार्षिक फुटबॉल स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूलने सेंट अँड्रय़ू हायस्कूलवर ४-० अशी मात केली. सेंट अँथनी, वाकालो संघाने सेंट झेवियर्स, बोरिवलीला २-० असे नमवले. जोनाथन पिंटो आणि स्टेखाम शेख यांनी प्रत्येक एक गोल केला. डॉन बॉस्को, माटुंगा आणि कॅथ्रेडल अँड जॉन कॅनन यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. नेव्ही चिल्ड्रन संघाने अ‍ॅक्टिव्हिटी संघाचा २-० असा पराभव केला. हिरानंदानी फाऊंडेशनने सेंट थेरेसा, वांद्रेचा ५-१ असा धुव्वा उडवला. होली फॅमिली, अंधेरीने ओएलपीएस, चेंबूरवर ३-१ अशी मात केली. स्वामी विवेकानंद, कांदिवली संघाने बॉम्बे इंटरनॅशनल, बाबुलनाथ संघावर ६-० असा दणदणीत विजय मिळवला.