भारताच्या सोमदेव देववर्मन याने अमेरिकन क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेतील पात्रता फेरीत आव्हान राखले. त्याने अमेरिकन खेळाडू रॉबी गिनेप्रीचा ७-६ (८-६), ६-३ असा पराभव केला.
 मुख्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्याला आणखी एकच सामना जिंकणे अनिवार्य आहे. सोमदेवचा गिनेप्री याच्याविरुद्ध मिळवलेला पहिलाच विजय आहे. त्याला आता ब्राझीलच्या गुलिहेर्मी क्लिझेर याच्याविरुद्ध खेळावे लागणार आहे. क्लिझेर याने फॅकुन्डो बाग्नीसचा ६-२, ७-६ (७-४) असा पराभव केला.
अंकिताची क्रमवारीत आगेकूच
युवा टेनिसपटू अंकिता रैनाने जागतिक क्रमवारीत एका स्थानाने सुधारणा करत २५२वे स्थान पटकावले आहे. पुरुष खेळाडूंमध्ये सोमदेव देववर्मन क्रमवारीत भारतातर्फे सर्वोच्च स्थानी आहे. सोमदेव १७१व्या स्थानी असून, रामकुमार रामनाथन २३३व्या स्थानी आहे. युकी भांब्री २५१व्या स्थानी आहे. दुहेरी प्रकारात लिएण्डर पेस २३व्या तर रोहन बोपण्णा २४व्या स्थानी स्थिर आहे.