सचिनने आज(रविवार) एकदिवसीय क्रिकेट मधल्या आपल्या प्रवासाला पुर्ण विराम दिला त्याबद्दल सचिन या क्रिकेटच्या विक्रमादीत्याबद्दलची काही निवडक माहीती.

संपुर्ण नाव- सचिन रमेश तेंडुलकर
जन्म – २४ एप्रिल १९७३(मुंबई)
उंची- १.६५ मी.(५.५ फूट)
मुख्य संघ- भारत, मुंबई, मुंबई इंडीयन्स, आशिया-११
उपादी(टोपण नाव)- लिटील मास्टर
पहीला सामना- मुंबई विरूद्ध गुजरात, मुंबईत (१९९८)
पहीला कसोटी सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान, कराची (१९८९)
पहीला एकदिवसीय सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान (१९८९)
पहीले कसोटी शतक- नाबाद ११९ धावा विरुद्ध इंग्लंड (१९९०)
पहीले एकरदीवसीय शतक- ११० धावा विरुद्ध आँस्ट्रेलिया, कोलंबोत (१९९४)
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा शतकांचे शतक ठोकणारा पहीला खेळाडू (५१ कसोटी व ४९ एकदिवसीय शतके)

सचिन बाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी-
* सचिनला खरंतर जलदगती गोलंदाज बनायचे होते, पण एम.आर.एफच्या (चैन्नई) अकॅडमीने नाकारले (१९८७)
* १९८७ सालच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वात लहान खेळाडू
* १९८८ साली शालेय क्रिकेट सामन्यात ३२६ धावांची खेळी करत विनोद कांबळी बरोबर केली ६६४ धावांची भागीदारी
* कराचीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या त्याच्या पहील्या कसोटी सामन्यात माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी आपले ‘क्रिकेट पॅड’ सचिनला दिले.
* सचिन जवळजवळ १.५ किलो वजनाच्या बॅटने खेळत आला.  
* वयाच्या २० वर्षा आत सचिनेने ५ कसोटी शतके ठोकली.
* १९९८ हे सचिनसाठी उत्कृष्ट क्रिकेट वर्ष- या वर्षात १८९४ धावा त्यात एकूण ९ शतके
* २०१२ साली राज्यसभेत सचिन खासदार.