भारतीय बॅडमिंटनपटू सौरव वर्मा, एच. एस. प्रणॉय आणि बी. साई प्रणीत यांनी मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पध्रेची दुसरी फेरी गाठली आहे. तर अजय जयराम आणि अरविंद भट यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.सातव्या मानांकित वर्माने चायनीज तैपेईच्या यांग चिह चाइहचा २१-१४, २१-१५ असा सहज पराभव केला. साई प्रणीतविरुद्धच्या लढतीत मलेशियाच्या वून कॉक हाँगने दुखापतीमुळे माघार घेतली. या सामन्यात साई ११-५ गुणांनी आघाडीवर होता. प्रणॉयने चीनच्या शिह कुई च्यूनला ३३ मिनिटांच्या लढतीत २१-१२, २१-१८ असे पराभूत केले.
जयरामने जपानच्या काझुमासा सकाईकडून १५-२१, ११-२१ अशी हार पत्करली. तर चीनच्या शि युकीने भटला २१-२५, २१-५ अशा फरकाने हरवले.