कानपूर कसोटीत भारतीय संघाविरुद्ध १९६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू मार्क क्रेग याला स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी गोलंदाजी करतेवेळी मार्क क्रेगची दुखापत बळावल्याने त्याला मैदान सोडावे लागले होते. मार्कने या सामन्यात दोन्ही डावांमध्ये भारतीय संघाच्या प्रत्येकी एक विकेट घेतली होती. दुखापतग्रस्त असतानाही सामन्याच्या पाचव्या दिवशी मार्क क्रेग फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पण त्याला केवळ एकच धाव करता आली. मोहम्मद शमीने मार्क क्रेग याला त्रिफळाचीत केले. मार्क क्रेगच्या जागी न्यूझीलंडच्या संघात जीतन पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. जीतन पटेल याला तब्बल तीन वर्षांनंतर न्यूझीलंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

वाचा: …म्हणून भारतीय संघाला ५०० वी कसोटी जिंकता आली

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

कानपूर कसोटी न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या दिवशी भारतीय संघाच्या नऊ विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात यजमानांना ३१८ धावांपर्यंत रोखण्यात किवींना यश देखील आले होते. पण प्रत्युत्तरात न्यूझीलंडला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. न्यूझीलंडचा पहिला डाव २६२ धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे भारतीय संघाला समाधानकारक आघाडी प्राप्त करता आली. दुसऱया डावात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करून न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४३९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ २३६ धावांपर्यंतच मजल मारला आली. सामना भारतीय संघाने १९७ धावांनी जिंकला.

वाचा: आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत आणि पाकिस्तानला संयुक्तरित्या अव्वल स्थान