28 May 2016

भारतीय तिरंदाजी, बॉक्सिंग संघटना निलंबित

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे भ्रष्टाचाराने बजबजलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर कारवाई करून देशातील खेळ व्यवस्थापनाचा बुरखा

नवी दिल्ली | December 7, 2012 2:01 AM

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे भ्रष्टाचाराने बजबजलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर कारवाई करून देशातील खेळ व्यवस्थापनाचा बुरखा टराटरा फाडल्याबद्दल क्रीडा क्षेत्रावर आज (शु्क्रवार) आणखी दोन मोठे आघात झाले. भारतीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय हौशी मुष्टियोद्धा संघटना (आयएबीएफ) आणि तिरंदाजी संघावर निलंबनाची कारवाई केली आहे. क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नुकत्याच पार पडलेल्या ‘आयएबीएफ’च्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याची शक्‍यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. ‘आयएबीएफ’चे प्रतिनिधी म्हणून अभयसिंह चौटाला यांनी ‘आयओए’ची निवडणूक लढविली. विशेष म्हणजे, चौटाला यांचे साडू आणि भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधील आमदार अभिषेक मटोरिया आता ‘आएबीएफ’च्या अध्यक्षपदी आहेत. आता या निवडणूकीत झालेल्‍या घोटाळ्यांचा तपास करण्‍यात येणार आहे. एकाच दिवशी दोन संघटनांवर निलंबनाची कारवाई झाल्याने देशाची मान शरमेने झुकली आहे.

First Published on December 7, 2012 2:01 am

Web Title: sports ministry de recognises boxing and archery associations