ताफ्यात दर्जेदार खेळाडू असतानाही नव्या दमाच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप सूर गवसलेला नाही. दुसरीकडे गतवर्षी पहिल्याच हंगामात सुरेख कामगिरी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला आपल्या दुसऱ्या हंगामात विजयाची प्रतीक्षा आहे.
डेव्हिड वॉर्नर-आरोन फिंच जोडीकडून हैदराबादला अपेक्षा आहेत. गोलंदाजीत डेल स्टेनला अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार यांची साथ मिळणे गरजेचे आहे. जेपी डय़ुमिनी आणि दिनेश कार्तिकवर दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त आहे. नॅथन कल्टर-नीले दुखापतग्रस्त झाल्याने दिल्लीची गोलंदाजी आणखी कमकुवत झाली आहे. मोहम्मद शमी आणि शाहबाझ नदीम यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. आतापर्यंत हैदराबादने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
सनरायजर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), श्रीकांत अनिरुद्ध, आशिष रेड्डी, रिकी भुई, आरोन फिंच, मॉझेस हेन्रिक्स, जेसन होल्डर, मनप्रीत जुनेजा, भुवनेश्वर कुमार, चामा मिलिंद, अमित मिश्रा, नमन ओझा, प्रशांत परमेश्वरन, परवेझ रसूल, इरफान पठाण, अमित पौनीकर, लोकेश राहुल, डॅरेन सॅमी, इशांत शर्मा, करण शर्मा, डेल स्टेन, ब्रेंडन टेलर, वेणुगोपाळ राव, डेव्हिड वॉर्नर.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), मयांक अगरवाल, नॅथन कल्टर-नीले, क्िंवटन डी कॉक, जेपी डय़ुमिनी, केदार जाधव, सिद्धार्थ कौल, मिलिंद कुमार, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम, जेमी नीशाम, वेन पारनेल, केव्हिन पीटरसन, एच.एस.शरथ, राहुल शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, राहुल शुक्ला, रॉस टेलर, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकट, मुरली विजय, जयंत यादव.