ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळाची परीभाषा बदलली असे मत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषद (आयसीसी) आणि एमआरएफ टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सचिन बोलत होता.
‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळात फार मोठे बदल झाले आहेत. खासकरून फलंदाजीची मानसीकता बदलली आहे. ‘रिव्हर्स स्वीप’सारख्या फटक्याने ‘थर्ड मॅन’ला चेंडू टोलावता येऊ शकतो, हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळेच पाहायला मिळत आहे,’’ असे सचिन म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘चाहत्यांनीही ट्वेन्टी-२० क्रिकेट आवडते आहे. ज्यांना खेळाबद्दल जास्त ज्ञान नाही, तेदेखील ट्वेन्टी-२० क्रिकेट पाहताना दिसतात. यामुळे खेळाची अधिक प्रसिद्धी होत आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटचे सामने चांगलेच रंगतदार होतात. बऱ्याचदा अटीतटीचे सामने पाहायला मिळतात. त्याचबरोबर तीन तासांचा हा खेळ असल्याने लोकांनीही त्याचा पूरेपूर आनंद लूटता येतो.’’