आंध्र प्रदेशातील मालवथ पूर्णा या तेरा वर्षांच्या मुलीने माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केले असून ती हे शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. पूर्णा हिच्यासमवेत साधनपल्ली आनंद कुमार (वय १६) हा नववीतील विद्यार्थी होता. तोही आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्य़ातील आहे. आज सकाळी त्यांनी शिखर सर केले.
आनंद व पूर्णा हे दोघेही आंध्र प्रदेशातील  विद्यार्थी आहेत.