विक्रांत मेहता आणि रुद्र कपूर यांनी अरुण वाकणकर स्मृती चषक आशियाई मानांकन टेनिस स्पर्धेतील मुलांच्या १४ वर्षांखालील गटात उपांत्य फेरी गाठली. विक्रांतने जयस्वाल याचा ६-४, ६-२ असा सहज पराभव केला. रुद्रने भगतानी याचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला. विपुल मेहताने तेजस्वी मेहरा याला ६-३, ६-३ असे नमविले. सिद्धांत भवनानीने गौरांग मिश्राचे आव्हान ६-२, ६-३ असे संपुष्टात आणले. मुलींमध्ये मुबाशिरा शेखने ऐश्वर्या आंदळकर पाटीलचा ६-२, ६-० असा पराभव केला. रिचाने साना खन्नाला ६-१, ६-३ असे नमविले. तनया शहाने निकिता सिंहमभाटिया हिचा ६-१, ६-४ असा पराभव केला.