भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला प्रग्यान ओझा आणि ३२व्या वर्षी कसोटी संघात स्थान पटकावलेल्या अमित मिश्राने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धची अनधिकृत कसोटी गाजवली. चार दिवसांची ही कसोटी अनिर्णीत झाली. ओझाने ६ तर मिश्राने ५ बळी घेतले.
भारताने पहिल्या डावात ३०१ धावांची मजल मारली. लोकेश राहुलने सर्वाधिक ९६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे स्टीव्हन ओ कॅफीने ६ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाचा डाव २६८ धावांत आटोपला.भारतातर्फे ओझाने ५ बळी घेतले. भारताने दुसरा डाव ८ बाद २०६ धावांवर घोषित केला. अभिनव मुकंदने ४० धावा केल्या. विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलिया संघाने ४ बाद १६१ अशी मजल मारली. पीटर हँड्सकॉम्बने ९१ धावा केल्या. कॅमेरुन बॅनक्रॉफ्टने ५१ तर ट्रॅव्हिस हेडने ५० धावांची खेळी केली.