भारतीय नेमबाजाचीचा पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखाने फडकवत ठेवून सुवर्णयश मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्रा याने सोमवारी व्यावसायिक नेमबाजी स्पर्धांतून निवृत्तीची घोषणा केली.
यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा ही माझी शेवटची स्पर्धा आहे. मात्र, मला २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही सहभागी होण्याची इच्छा आहे. उद्याचा दिवस माझ्या व्यावसायिक नेमबाजीचा शेवटचा दिवस आहे. असे असले तरी, भविष्यातही मी नेमबाजी करत राहणार आहे आणि प्रशिक्षण घेतच राहणार असल्याचे ट्विट अभिनवने आपल्या ट्विटर अकाऊंटवर केले आहे.
अभिनव आशियाई स्पर्धेत सहभागी झाला असून, तो मंगळवारी १० मीटर एअर रायफल प्रकारात सहभागी होणार आहे. जागतिक स्तरावरच्या सर्व प्रतिष्ठेच्या स्पर्धाची पदके अभिनवच्या नावावर आहे. मात्र या स्पर्धेने त्याला पदकापासून वंचित ठेवले आहे. हा हिशेब चुकता करण्यासाठी अभिनव तय्यार आहे. आशियाई स्तरावर वर्चस्व गाजवून स्पर्धेला अलविदा करण्याचा अभिनवचा मानस असेल. अभिनवने बिजींगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णकमाई केली होती.