भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. क्रिकेटने खूप काही दिले आहे. बघायला गेले तर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, विराट कोहली, राहुल द्रविड आणि खूप काही क्रिकेटर आज जे काही आहेत ते या खेळा मुळेच. आपण ह्या खेळाची थोडी वेगळी चर्चा करूया. क्रिकेटमध्ये जर तुम्ही कर्णधार म्हणून देशाचे नेतृत्त्व करत असाल तर तो एक बहुमान समजला जातो. चला आपण पाहूया हा बहुमान ज्यांना ज्यांना मिळाला त्यांनी त्या संधीचे किती सोनं केले. आपण वनडेत जे कर्णधार होते त्यांचा जरा इतिहास तपासून पाहूया. त्यांनी आपल्या कॅप्टनशीपमध्ये कोणते रेकॉर्ड केले आहेत ते पाहूया. कोणत्या कर्णधाराने किती सामने जिंकून दिलेत त्याचा हा लेखजोखा. १) रिकी पॉन्टिंग ( २००२-२०१२) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा महत्त्वाचा दुवा राहिला आहे. एकदिवसीय आणि कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या यादीत रिकीचे नाव आवर्जून घेतले जाते. दोन वेळा रिकीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला आहे. रिकीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने २३० एकदिवसीय सामने खेळले त्यात १६५ विजय आणि ५१ सामन्यात हार पत्करली. जिंकण्याची टक्केवारी ७६% होती. २) महेंद्रसिंग धोनी (२००७- २०१७) महेंद्रसिंग धोनी जन्म – ७ जुलै १९८१, जन्मस्थान – रांची, बिहार(झारखण्ड). एक शांत पण मुत्सद्दी आणि हुशार कर्णधार म्हणून महेंद्र सिंह धोनीचं नाव आवर्जून घेतले जाते. २०११ चा वर्ल्ड कप आपण धोनी कर्णधार असताना जिंकलो होतो. त्या नंतर चॅम्पियन ट्रॉफी आणि वर्ल्ड ट्वेंटी-२० स्पर्धा धोनी कर्णधार असताना जिंकलो होतो. धोनी कर्णधार असताना २००९ साली पाहिल्यांदा भारताने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या नंबरवर राहण्याचा मान मिळवला होता. धोनी कर्णधार असताना भारत सुमारे १९९ एकदिवसीय सामन्यात १०८ विजय आणि ७२ सामन्यात हार पत्करली. जिंकण्याची टक्केवारी ५९.७८% होती. ३) अॅलन बॉर्डर ( १९८५-१९९४ ) ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर एक स्फोटक बल्लेबाज म्हणून नावारूपास आले. डाव्या हाताने बॅटिंग करणारा महान आस्ट्रेलियन क्रिकेटर अॅलन बॉर्डर नावाने कसोटी पुरस्कार दिला जातो. १७८ एकदिवसीय सामन्यात १०७ विजय आणि ६७ सामन्यात हार पत्करली.जिंकण्याची टक्केवारी ६१.४२% होती. ४) हॅन्सी क्रोनिए (१९९४-२०००) २५ सप्टेंबर १९६९ रोजी एका दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचा जन्म झाला. वेसल जोहान्नेस ‘हॅन्सी’ क्रोनिए हे त्याचं नाव. हॅन्सी क्रोनिए हा एक उमदा खेळाडू सगळ्यापलीकडे त्याचे नेतृत्वही उठून दिसणारे होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि चतुर कप्तान अशी त्याची ओळख होती. आफ्रिकेतील एक प्रतिष्ठित घराण्यात त्याचा जन्म झाला होता त्याचे वडीलही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले होते. असा हा चतुर कॅप्टन सामना निश्चिती प्रकरणात अडकला गेला आणि पूर्ण क्रिकेट विश्वाला हादरा बसला. एका मालवाहू विमानातून आपल्या घराकडे परतत असताना (१ जून २००२) नियतीने त्याचा बळी घेतला. असा हॅन्सी क्रोनिए सामना निश्चिती प्रकरणात दोषी असला तरी त्याचे देशासाठी केलेले कार्य नाकारू शकत नाही. १३८ एकदिवसीय सामन्यात ९९ विजय आणि ३६ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ७३.०७% होती. ५) स्टीफन फ्लेमिंग ( १९९७- २००७ ) निश्चयी आणि आकर्षक असा डाव्या हाताने फलंदाजी करणारा स्टीफन फ्लेमिंग नेहमीच एक उत्साही व्यक्तिमत्व. न्यूज़ीलैंड साठी सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून स्टीफन फ्लेमिंगच नाव घेतले जाते. तो पहिला फलंदाज होता ज्याने न्यूज़ीलैंड साठी ७००० कसोटी धावा केल्या. २१८ एकदिवसीय सामन्यात ९८ विजय आणि १०६ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ४८.०% होती. ६) ग्रॅमी स्मिथ ( २००३-२०११ ) ग्रॅमी स्मिथ दक्षिण आफ्रिकेचा हिरो आहे. २००३ विश्वचषकानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत स्मिथने संघाचे नेतृत्व स्वीकारले. स्वतःला संघासाठी झोकून देणे हे त्याची खासियत. हॅन्सी क्रोनिएनंतर जर कोणी दक्षिण आफ्रिकेला चांगले क्रिकेट दिले असेल ते ग्रॅमी स्मिथ ने. तसेच सलामीच्या फलंदाजाची भूमिकाही समर्थपणे पेलली. १५० एकदिवसीय सामन्यात ९२ विजय आणि ५१ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ६४.०२% होती. ७) मोहम्मद अझरुद्दीन ( १९९०- १९९७ मोहम्मद अजहरुद्दीन एक स्टायलिस्ट बॅट्समन. कलात्मक फटके हे त्याची खासियत. एक उत्तम क्षेत्ररक्षण म्हणून त्याची ओळख. कपिल देव नंतर अजहरुद्दीन हा एक भारताचा कणा होता कारण ही तसेच होते भारताची क्षेत्ररक्षण म्हणजे सुमार दर्जाचे पण मोहम्मद अजहरुद्दीने स्वतःची एक उत्तम क्षेत्ररक्षण म्हणून ओळख निर्माण केली. त्या नंतर भारताने खूप चांगले प्रगती केली. उजव्या हाताने फलंदाजी करताना त्याने खूप सुंदर खेळी केल्या होत्या. एका हाती सामना जिंकून देण्याची कला मोहम्मद अजहरुद्दीन मध्ये होती. पण सामना निश्चिती प्रकरणात सुंदर खेळीचा अंत झाला. पण त्याने दिलेले योगदान निश्चितच दखल पात्र आहे. १७४ एकदिवसीय सामन्यात ९० विजय आणि ७६ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ५४.०१% होती. ८) अर्जुन रणतुंगा ( १९८८-१९९९ ) अर्जुन रणतुंगा हा श्रीलंका क्रिकेट टीमच्या माजी यशस्वी कर्णधारापैकी एक मानला जातो. १९९६ सालचा वर्ल्ड कपही श्रीलंकेने रणतुंगाच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. १९३ सामन्यात ८९ विजय आणि ९५ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ४८.०३% होती. ९ ) सौरव गांगुली (१९९९-२००५) सौरव गांगुली गांगुली डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज. मैदानात खडूस वाटणारा सौरव एकदम झकास फलंदाज. त्याची फलंदाजी आणि तसेच संघनायक म्हणून त्याचा वावर खूपच लोभनीय होता. नो गिव्ह अप तत्वावर चालणारा गांगुली खूपच खास होता. प्रतिस्पर्ध्याला शब्दाने डिवचत माईंड गेम खेळणारा पहिला भारतीय कर्णधार होता. खूप हुशार आणि शिस्तप्रिय, आपल्या खेळाडू करून उत्तम कामगिरी करून घेत त्यांना प्रेरणा देत उंच कामगिरी करत भारताला जिंकून देत असे. १४७ एकदिवसीय सामन्यात ७६ विजय आणि ६६ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ५३.०५% होती. १०) इम्रान खान ( १९८२-१९९५ ) इम्रान खान उच्च शिक्षित अष्टपैलू खेळाडू. ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू. एक असा अष्टपैलू खेळाडू ज्याने पूर्ण क्रिकेट जगावर आपली झाप सोडली होती ती आपल्या अनोख्या हेअर स्टाईल ने तर कधी आपल्या गोलंदाजीने. फटकेबाजी ही सुद्धा जमेची बाजू होती. क्वचितच असे अष्टपैलू घडत असतात. पाकिस्तान इम्रान खान चा बाबतीत नशीबवान म्हणावा लागेल. १३९ एकदिवसीय सामन्यात ७५ विजय आणि ५९ पराजयाचा सामना केला. जिंकण्याची टक्केवारी ५५.०९% होती.