घरच्या मैदानावर चांगले यश मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय संघास आगामी चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत खडतर कसोटीस सामोरे जावे लागणार आहे. त्यांना साखळी गटात ऑलिम्पिक विजेता जर्मनी व विश्वचषक उपविजेता नेदरलँड्स यांच्याशी खेळावे लागणार आहे.
ही स्पर्धा भुवनेश्वर येथे ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. साखळी गटातच भारतापुढे विश्वचषक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता अर्जेन्टिना यांचेही आव्हान असणार आहे. साखळी ‘अ’ गटात गतविजेता ऑस्ट्रेलिया, राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता इंग्लंड, युरोपियन रौप्यपदक विजेता बेल्जियम व आशियाई सुवर्णपदक विजेता पाकिस्तान यांचा समावेश आहे.
कलिंगा स्टेडियमचे ऑलिम्पिक दर्जाच्या स्टेडियममध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या स्टेडियमवर पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.