देशातील क्रीडारत्नांचा आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. खेलरत्न आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर अर्जुन पुरस्कारांचे वितरण सुरू झाले.

वाचा: विनेशला सावरण्यासाठी एक आठवडा लागणार

पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंची थोडक्यात माहिती देऊन त्यांना मंचावर आमंत्रित केले जात होते व राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येत होते. कुस्तीपटू विनेश फोगट हिला अर्जुन पुरस्कार स्विकारण्यासाठी मंचावर आमंत्रित करण्यात आले, मात्र खुद्द राष्ट्रपतींनी मंचावरून खाली उतरून विनेश हिचा सन्मान करणे योग्य समजले. रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान विनेश हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. दुखापतीमुळे तिला सामना देखील अर्धवट सोडावा लागला होता. तिच्यावर सध्या उपचार सुरू तूर्तास तिला आधार घेऊन चालावे लागत आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात विनेश ‘व्हीलचेअर’वर होती. त्यामुळे पुरस्कार घेण्यासाठी तिला मंचावर येणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने प्रणव मुखर्जी स्वत: मंचावरून खाली उतरले आणि तिचा सन्मान केला. विनेशला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर उपस्थितांचे डोळे पाणावले आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.

वाचा: देशातील ‘क्रीडारत्नां’चा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; सिंधू, दीपा, साक्षी आणि जीतू रायला ‘खेलरत्न’ प्रदान

CrApq1cWYAIuiS6


Nepal Bans Pune Police Couple For 10 Years Over… by Loksatta1