ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर डावखुरा फलंदाज युवराज सिंगवर टीका झाली. पण ही टीका सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या पचनी पडत नसून त्याच्यावरील टीका अयोग्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर युवराजवर टीका झाली, माझ्या मते ही टीका अयोग्य आहे. युवराजने भारताला दोन विश्वचषक जिंकवून दिले आहेत. संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत आणि त्यामुळेच अशा खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा,’’ असे कोहली म्हणाला.
बंगळुरूच्या पहिल्याच सामन्यामध्ये युवराजने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद ५२ धावांची खेळी साकारली होती. या सामन्याविषयी कोहली म्हणाला की, ‘‘युझवेंद्र चहल, वरुण आरोन यांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे आम्ही दिल्लीला १४५ धावांर्पय रोखू शकलो. आमच्याकडून हवी तशी फलंदाजी झाली नाही.’’