भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या पुण्यातील एकदिवसीय सामन्यात कोहलीने १२२ धावांची तुफान खेळी साकारून भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला. कोहलीने केदार जाधवसोबत पाचव्या विकेटसाठी तब्बल २०० धावांची भागीदारी देखील साकारली. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्यातील विजयानंतर भारतीय संघ आत दुसऱया सामन्यासाठी कटक येथे रवाना झाला. भारतीय संघाचा गुरूवारी इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना खेळविला जाणार आहे.

वाचा: ‘कोहलीच्या फलंदाजीत मला कोणत्याही त्रुटी आढळत नाहीत’

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 : चेन्नईसाठी आनंदाची बातमी, पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला बोर्डाकडून मिळाली सुट्टी
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?

कटक येथील हॉटेल्समध्ये रुम उपलब्ध नसल्याने भारतीय संघाने पुण्याच्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना सरावासाठी देखील वेळ मिळाला. आराम करण्याऐवजी खेळाडूंनी पुण्यात नेटमध्ये घाम गाळला. यात विराटने बुधवारी नेटमध्ये कसून सराव केला. विराटने सरावात मोठ्या फटक्यांवर भर दिला. मोठे फटके खेळण्याच्या सरावातून कोहलीने यावेळी आपल्या स्नायूंवर ताण देऊन ते अधिक लवचिक होतील यासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. कटकमधील स्टेडियमवर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने या स्टेडियमवर आजवर एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. त्यामुळे कटक सामन्यात भारताचे पारडे जड आहे. कटक सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.

वाचा: विराटमध्ये कॅप्टनशीपची उपजत क्षमता, कोहलीच्या प्रशिक्षकाचे मत

कोहलीने पहिल्या सामन्यात १०२ चेंडूत १२२ धावांची खेळी साकारली होती. यंदाच्या वर्षाची सुरूवात कोहलीने शतकी कामगिरीने केली. याशिवाय २०१६ या वर्षात कोहलीने ४० सामन्यांत तब्बल २५८० धावा ठोकल्या. कोहली गेल्या वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आयसीसीच्या एकदिवसीय आणि कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली दुसऱया स्थानावर होता.