भारतीय क्रिकेट संघाचा शिलेदार विराट कोहलीने जगातील सर्वात ‘मार्केटेबल’ खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. ‘स्पोर्ट्स प्रो’ या नियतकालिकाने क्रीडा व्यवसाय आणि जगातील सर्व खेळाडूंच्या क्रमवारीबाबतच्या निषकांवर व्यापक संशोधन करून जाहीर केलेल्या अहवालात कोहलीने जगातील मोस्ट मार्केटेबल खेळाडूंच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. तर या सर्वेक्षणामध्ये बास्केटबॉलपटू स्टिफन करी हा सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला आहे. त्याखालोखाल युव्हेंट्स क्लबचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पॉग्बा दुसऱया स्थानावर आहे. ब्राझिलचा तारा फूटबॉलपटू नेयमार हा आठव्या स्थानी आहे.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच या यादीत तेविसाव्या, मेस्सी २७ व्या, तर धावपटू उसेन बोल्ट ३१ व्या स्थानी आहे. भारताची टेनिस स्टार सायना मिर्झाने देखील या यादीत पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.