विराट कोहलीने इतक्यातच भारताच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद स्विकारण्याची घाई करू नये, असे मत भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. विराटने सर्व प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविण्यापेक्षा स्वत:चा आणखी विकास होऊन द्यावा. सध्या तो कसोटी संघाचा कर्णधारपदी योग्य आहे. २०१९ सालचा विश्वचषक अजून खूप दूर आहे. त्यामुळे क्रिकेटच्या इतर प्रकारांमध्ये त्याला भारतीय संघाचा कर्णधार बनविण्याची घाई केली जाऊ नये, असे गावस्कर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत कोहलीने ट्वेन्टी-२० विश्वचषकांसह अन्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर विराट लवकरच महेंद्रसिंग धोनीची जागा घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
२०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनी कर्णधारपदावर टिकल्यास आश्चर्य -गांगुली