22 August 2017

News Flash

VIDEO: मानहानीकारक पराभवानंतर कोहलीकडून ‘विराट’ खिलाडूवृत्तीचे दर्शन

आयसीसीकडूनदेखील विराट कोहलीचे कौतुक

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 12:53 PM

विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक

आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानने भारताचा मानहानीकारक पराभव करत पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी संघाचे कौतुक केले आहे. ‘पाकिस्तानी संघाचा दिवस असतो, त्यावेळी हा संघ जगातील कोणत्याही संघाला पराभूत करु शकतो,’ अशा शब्दांमध्ये कोहलीने प्रतिस्पर्ध्यांचे कौतुक केले.

भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र तरीही कोहलीने पाकिस्तानच्या शानदार खेळाचे कौतुक केले. ‘पाकिस्तानी संघाचे अभिनंदन. त्यांच्यासाठी यंदाची स्पर्धा शानदार होती,’ असे कोहलीने म्हटले. ‘ज्याप्रकारे त्यांनी परिस्थिती बदलली, ते कौशल्य पाकिस्ताने संघाची क्षमता दाखवून देते. पाकिस्तानी संघाचा दिवस असल्यास ते कोणत्याही संघाला नमवू शकतात आणि ते त्यांना पुन्हा एकदा दाखवून दिले आहे,’ अशा शब्दांमध्ये कोहलीने पाकिस्तानचे कौतुक केले.

‘आमची कामगिरी निराशाजनक झाली. मात्र तरीही माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. कारण आम्ही चांगले खेळून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो आहोत. मला माझ्या संघाचा अभिमान वाटतो. अंतिम फेरीतील यशाचे पूर्ण श्रेय पाकिस्तानला जाते. त्यांनी सामना एकतर्फी केला,’ असेही कोहलीने पुढे बोलताना म्हटले. पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक करण्यावरच न थांबता कोहली त्यांच्या आनंदात सहभागीदेखील झाला. पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत बातचीत करत आणि अगदी हसतखेळत विराट कोहलीने खिलाडूवृत्तीचा परिचय दिला. विशेष म्हणजे विराट कोहली पाकिस्तानच्या खेळाडूंच्या आनंदात सहभागी होत असल्याचा व्हिडिओ आयसीसीने ट्विट केला आहे.

भारताला पराभूत करत पाकिस्तानने पहिल्यांदाच चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरले. मात्र पाकिस्तानच्या विजयामुळे तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले. कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंत प्रवास अतिशय चांगला होता. मात्र अंतिम फेरीत भारतीय संघ पूर्णपणे ढेपाळला.

First Published on June 19, 2017 12:53 pm

Web Title: virat kohli shows great sportsman spirit after the defeat from pakistan in champions trophy final
 1. V
  Viren Narkar
  Jun 20, 2017 at 4:01 pm
  ह्याला म्हणतात खरीखुरी खिलाडू वृत्ती. आम्हीही दुबईत आमच्या पाकिस्तानी मित्रांचे अभिनंदन केले पण त्यांनी दिलेल्या पार्टित जाऊ शकलो नाही कारण तिथे बरेच माथेफिरू येतात आणि वाटेल ते बडबडतात जे आम्ही न करू शकत नाही.
  Reply
  1. V
   Vinay
   Jun 20, 2017 at 2:32 pm
   वैद्यबुवा, गरळ ओकून बंद करा ना राव. खेळ तिथंच सोडून द्या. देशप्रेम आणि खेळ ह्या गोष्टीची गल्लत नेहमी का करता हो? जर, पाकिस्तान च्या क्रिकेट संघाला हरवायचे लक्ष ठेऊनच तुम्ही मैदानात उतरला होता तर तिथंच खरंतर खेळ संपला होता. राहिला होतं ते फक्त युद्ध. मग सरळ युद्धच करा ना! ह्या ह्या असल्या सडक्या वैचारिकते मुळे पाकिस्तान ची वाट लागली. हीच धर्मांधता ह्या देशात आणून काय सिद्ध करायला निघालात?कोणत्याही विचाराचा अतिरेक सर्वनाशाकडेच नेतो. अगदी जाज्वल्य देशभक्ती सुद्धा. जोपर्यंत तिला वैचारिकतेचा जोड नसते.
   Reply
   1. S
    Shivram Vaidya
    Jun 19, 2017 at 6:24 pm
    ..३..त्यातही सामना संपल्यानंतर हस्तीदंती दाखवत सामन्यावर "भाष्य" करत असलेल्या विराट कोहलीला बघून तर हसावे की रडावे तेच कळेना ! सर्वात महत्वाचे म्हणजे सामना संपल्यानंतर एका वर्तमानपत्रामध्ये वाचलेली एक बातमी आठवली. ती म्हणजे, "भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालावर दोन हजार कोटींचा सट्टा लागला होता". असो.
    Reply
    1. S
     Shivram Vaidya
     Jun 19, 2017 at 6:24 pm
     ..२.."अफलातून" होती. पाकिस्तान एकीकढे धावांचा पाऊस पाडत असतांनाही आपले तमाम खेळाडू "निर्धास्त" असल्यासारखेच वाटत होते. त्यात भारतीय गोलंदाजांनी अवांतर धावा देण्याचा सपाटाच लावला होता. हे बघून समोर काय होते आहे हेच कळत नव्हते. सामना बघत असतांना आपल्या खेळाडूंच्या अनेक "चाली" अनाकलनीय अशाच होत्या. एवढे होऊनही आपले खेळाडू पाकिस्तानने केलेल्या धावा ज पार करून करंडकावर आपले नाव कोरतील अशी "भाबडी" आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र फलंदाजांनी ज्या पद्धतीने आपल्या विकेट्स "दान" केल्या ते बघून तमाम क्रिकेट रसिकांचा पूरता भ्रमनिरास झाला. एक हार्दिक पांड़्या सोडला तर भारताचा एकही खेळाडू खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहू शकला नाही. हार्दिक पांड़्याचा रविंद्र जाडेजाने "बळी" घेतला तेव्हा तर आश्चर्याचा धक्काच बसला. हार्दिक आऊट झाल्यानंतर भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आणि भारताने मोठया धावसंख्येने हा सामना आपल्या पाकिस्तानच्या खिशात "बळजबरीने" घातला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मोठे विजय मिळवून गेलेला आपला संघ हाच आहे ना अशी विचारणा सर्वच जण आपल्या मनाशी करत बसले. त्यातही सामना ...३...
     Reply
     1. S
      Shivram Vaidya
      Jun 19, 2017 at 6:23 pm
      चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे तमाम देशाचे लक्ष लागून राहिले होते. आसेतुहिमाचल लोकांचे या सामन्याकडे लक्ष लागले होते. या सामन्यात आपला विजय व्हावा म्हणून लोकांनी यज्ञ, सत्यनारायण, गंगापूजन असे अनेक विधी केले होते. हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामुदायिक पार्थनाही केल्या होत्या. एवढेच नाही तर सर्वसामान्य नागरीकांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या लष्कराने, सुरक्षा सेवकांनी देखिल भारतीय संघाला विविध कार्यक्रम आयोजित करून शुभेच्छाही दिल्या होत्या. भारतीय संघाची अलिकडल्या काळातील यशस्वी कामगिरी बघता, या स्पर्धेचा विजेता भारतीय संघच ठरेल यात संशय नव्हता. या सामन्यामधील आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या खुद्द पाकिस्तानलाही याविषयी शंका नसावी. या पार्श्वभुमीवर हा सामना ज्यांनी अथपासून इतिपर्यंत पाहिला त्यांना, आपल्या खेळाडूंनी केलेल्या अजोड "कामगिरी"वर विश्वास ठेवता येणार नाही. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अविश्वसनीय होते. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीने केलेली क्षेत्ररक्षकांची रचना, गोलंदाजीमध्ये केलेले "बदल", खेळाडूंची एकूणच ..2...
      Reply
      1. Y
       yug
       Jun 19, 2017 at 4:54 pm
       अश्याने पाकिस्तान सुधारणार नाही .त्यांना अहिंसा परमो धर्माची ,प्रेमाची ,वासुदेव कुटुम्बकम याची भाषा समजायला आमची भगवद्गीता वाचायला हवी.आपण कितीही हळवे झालो तरी अफझलखानाची औलाद पोटात खंजीर खुपसणारी आहे .
       Reply
       1. A
        A.A.Choudhari
        Jun 19, 2017 at 3:08 pm
        अशा प्रकारचे औदार्य आम्ही पहिल्यापासून दाखवत आलो आहे .पण खेळापासून ते सैन्यापर्येंत ते लोक आम्हाला शत्रू समजत आहेत त्याचे काय? सर्व सामान्य मानस संत नसतात !
        Reply
       2. S
        sachin k
        Jun 19, 2017 at 2:58 pm
        पाकिस्तानचए आभार त्यांनी ट्रॉफी जिंकली पण माझा देश आणि माझे भारतीय हे जगातील कोणत्याही माणसाचे मन जिंकू शकतो हेच कोहली ने आणि पंड्या ने दाखून दिले.जय हिंद..
        Reply
        1. S
         sachin k
         Jun 19, 2017 at 3:00 pm
         i aplogize.. its congrats pak instead of thanking pak..
         Reply
        2. Load More Comments