चौथ्या कसोटीवर भारताची पकड मजबूत झाली आहे. वानखेडे मैदानावर भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा चांगलाच समाचार घेतला. मुरली विजयने आपले आठवे शतक पूर्ण केले. तर, विराट कोहलीने त्याचे तिसरे द्विशतकही पूर्ण केले. तीन द्विशतक करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार आहे.

काल त्याने आपले १५ वे शतक पूर्ण करीत ४,००० धावांचा टप्पा ओलांडला. या कसोटीमध्ये अनेक रेकॉर्ड मोडले गेले. मुरली विजय हा गेल्या पन्नास वर्षातील पहिला भारतीय सलामीवीर बनला आहे ज्याने इंग्लंडविरुद्ध दोन शतके केली. या आधी हा विक्रम पंकज रॉय आणि बुधी कुंदरन यांच्या नावावर होता.

विराट कोहलीने ४,००० धावा पूर्ण केल्या. कसोटीमध्ये ४,००० धावांचा टप्पा गाठणारा तो पंधरावा फलंदाज आहे. सर्वाधिक जलद गतीने ४,००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या पंक्तीत तो गेला आहे. या धावा पूर्ण करण्यासाठी विराटला ८९ डाव लागले तर वीरेंद्र सेहवाग आणि सुनिल गावसकर यांना ८१ डाव खेळावे लागले होते.
२,००० च्यावर धावा करणारा विराटहा सातवा कर्णधार आहे. त्याने ३४ डावांमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. सुनील गावसकर यांना हा टप्पा ओलांडण्यासाठी ३९ डाव खेळावे लागले होते.

एका मालिकेमध्ये ५०० पेक्षा अधिक धावा काढणारा विराट हा दुसरा कर्णधार आहे. त्याच्यापुढे केवळ सुनील गावसकर आहेत. त्यांनी १९८१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७३२ धावा केल्या होत्या.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार आहे. त्याने २००६ साली राहुल द्रविडने १०९५ धावा केल्या होत्या. त्याने हा विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करणारा कर्णधार या विक्रमात त्याने सचिनची बरोबरी केली आहे. सचिनच्या नावावर १९९७ मध्ये चार शतके होती.

एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० या तीनही फॉर्मटमध्ये त्याची सरासरी ५० च्यावर आहे. एकदिवसीय मॅचेसमध्ये ५२, टी-२० मध्ये ५७ तर कसोटीमध्ये ही ५० च्या वर आहे.