मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वयानुसार नजर कमजोर होत जाते आणि मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून चष्मा डोळ्यांवर चढतो. सध्या धावांच्या दुष्टचक्रात हरवलेला वीरेंद्र सेहवागने सराव शिबिरात चष्मा घालून सराव केला आणि साऱ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. सेहवाग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही चष्मा घालून खेळणार का, यावर चर्वितचर्वण सुरू असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेहवाग चेन्नईत २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात चष्मा घालूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करणार आहे.
सेहवागने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सराव करताना चष्मा लावला होता. पहिल्या कसोटी सामन्यातही तो चष्मा घालणार आहे, पण त्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पावलावर पाऊल ठेवत तो 'कॉन्टॅक्ट लेन्स' बसवणार आहे, असे सूत्रांकडून समजते.
सेहवागला यापूर्वी कानांची समस्या जाणवली होती, त्याला एका कानाने कमी ऐकू येत होते. त्यानंतर आता नजर कमजोर झाल्यामुळे त्याला सध्या तरी चष्मा घालून खेळावे लागणार आहे. भारतीय संघात चष्मा घालून खेळणारा सेहवाग काही पहिला खेळाडू नाही. यापूर्वी माजी सलामीवीर पंकज रॉय आणि अंशुमन गायकवाड हे चष्मा घालून खेळलेले आहेत. त्याबरोबर माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप जोशी, माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली हेदेखील यशस्वीरीत्या खेळले आहेत. पण सेहवागला या नवीन बदलामुळे फायदा होतो की तोटा, हे पहिल्या सामन्यानंतरच कळू शकेल.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















